भोरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा थाटात; सर्वधर्मीय 27 जोडपी विवाहबद्ध | पुढारी

भोरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा थाटात; सर्वधर्मीय 27 जोडपी विवाहबद्ध

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर येथे अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (दि. 28) सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर-वेल्हा-मुळशी यांच्या वतीने या सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 27 जोडपी विवाहबद्ध झाली. आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर विश्वचैतन्य परमपूज्य अण्णा महाराज यांचे उत्तराअधिकारी स्वामी पोपट महाराज यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला.

या वेळी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा स्वरुपाताई थोपटे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवानेते पृथ्वीराज थोपटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, पोपट सुके, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, गणेश पवार, अमित सागळे, अतुल किंद्रे, राजेंद्र शेटे, संदीप नांगरे, रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ आदी उपस्थित होते.

वधू-वरांसाठी लकी ड्रॉ

या विवाह सोहळ्यात वधू -वरांसाठी 11 लकी ड्रॉ काढण्यात आले. यामध्ये दुचाकी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रो ओव्हन, पीठगिरणी, टेबल फॅन, शेगडी, मिक्सर, डिनर सेट, टीव्ही अशी बक्षिसे देण्यात आली. सोहळा यशस्वी करण्यासाठी 625 स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 10 हजार वर्‍हाडींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या नेतृत्वाखाली व श्री सद्गुरू नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने अनंतराव थोपटे गौरव समितीच्या वतीने आजपर्यंत झालेल्या 12 सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत विवाह सोहळ्यांमध्ये 754 विवाह झाले. या विवाह सोहळ्यांमुळे गरिबांचे संसार सुखी झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

-संग्राम थोपटे, आमदार, भोर.

हेही वाचा

Back to top button