Loksabha election : मतदान केंद्रावर पडदानशी महिलांसाठी असणार ‘या’ विशेष सुविधा..! | पुढारी

Loksabha election : मतदान केंद्रावर पडदानशी महिलांसाठी असणार 'या' विशेष सुविधा..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पडदानशी महिलांसाठी मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मुस्लिमबहुल भागातील केंद्रांवर ही सुविधा असणार आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील 87 मतदान केंद्रांवर ही सुविधा करण्यात आली आहे. महिलांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे शहरात केवळ 50 टक्के मतदान झाले होते. पडदानशी महिलांना प्रोत्साहन म्हणून मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर स्वतंत्र महिला कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वाधिक 42 मतदान केंद्रे हडपसर विधानसभा मतदारसंघात, तर त्यापाठोपाठ 14 मतदान केंद्रे जुन्नर विधानसभा मतदारसंघात असणार आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पडदानशी असलेल्या विविध भागांत आणखी मतदान केंद्रे वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

 

हेही वाचा

Back to top button