खर्चाच्या नोंदवहीतील प्रत्येक पानासाठी उमेदवारांना भरावा लागेल एक रुपया.. | पुढारी

खर्चाच्या नोंदवहीतील प्रत्येक पानासाठी उमेदवारांना भरावा लागेल एक रुपया..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा तपशील ठेवला जातो. हा तपशील ठेवला जात असलेल्या वहीची प्रत जर उमेदवारांना पाहिजे असल्यास त्यांना प्रत्येक पानासाठी केवळ एक रुपया एवढे शुल्क निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे भरावे लागणार आहे. या खर्चाची उमेदवारांना तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणी या तरतुदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्चविषयक लेख्याची तपासणी करण्यात येणार आहे. खर्च तपासणी विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन शाखेमध्ये बघता येणार आहे.

तर खर्च तपासणीची पहिली तपासणी 25 एप्रिल रोजी, दुसरी तपासणी 1 मे आणि तिसरी तपासणी 6 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे. तपासणी दिनांकाच्या वेळी उमेदवार किंवा त्यांचा अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहता येणार आहे. तपासणी दिनांकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिवशी नोंदवही तपासण्यात येणार नाही. तपासणी दिनांकाच्या दिवशी उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्यास अथवा खर्चात तफावत आल्यास नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button