धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील राज्य राखीव दलाचे सहायक समादेशक तथा पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत बाबूराव पारसकर यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक ६ अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील नर्सिंग अधिकारी व त्यांच्या सहकारी पाच महिला नर्सिंग अधिकारी यांनी १४ व १५ एप्रिल रोजी गैरहजर राहिले. त्यामुळे पारसकर यांनी या दिवसांची हजेरी लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर एसीबीने सापळा लावून सोमवारी (दि.२२) पारसकर यांच्या निवासस्थानी पथकाने अटक केली आहे.
हेही वाचा: