मतदानानंतर चिठ्ठी न पडल्यास घेता येईल हरकत : जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्टीकरण | पुढारी

मतदानानंतर चिठ्ठी न पडल्यास घेता येईल हरकत : जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदानानंतर व्हीव्हीपॅट मशिनमध्ये दिसणार्‍या चिठ्ठीबाबत व्हॉट्सअ‍ॅपवरून एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारित होत असून, त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, प्रसारित होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे, त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे.

त्यानुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवाराला दर्शवीत असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदाराला निवडणूक संचालन नियम 1961 च्या नियम 49 एमए अन्वये चाचणी मतदान करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतूद आहे. तसेच, सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंडसहिता कलम 177 अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचे देखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button