Loksabha election 2024 : शांततापूर्ण मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम

Loksabha election 2024 : शांततापूर्ण मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील चारही मतदारसंघांत मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे, यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावे. त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा करण्यासोबत त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूकविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार आदी उपस्थित होते. चोक्कलिंगम म्हणाले, एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्ष ठेवण्यात यावा.

मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी शक्य असल्यास शहरी भागात प्रतीक्षा कक्षाची सुविधा करावी. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे 100 मिनिटांत निवारण करावे. मतदानाच्या वेळी येणार्‍या अडचणी टाळण्यासाठी मतदान केंद्र पथकाला मतदान आणि ईव्हीएमविषयक सूक्ष्म बाबींचे प्रशिक्षण द्यावे. तसेच मावळ, बारामती आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनीही निवडणूक तयारीची माहिती सादर केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news