पुणे हवामान विभागाच्या प्रमुखपदी पुन्हा डॉ. खोले | पुढारी

पुणे हवामान विभागाच्या प्रमुखपदी पुन्हा डॉ. खोले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे हवामान विभागाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. अनुपम कश्यपी हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ही घोषणा हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी केली.
डॉ. अनुपम कश्यपी हे गेल्या पाच वर्षांपासून या पदावर कार्यरत होते. ते 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागात त्या गत 28 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी कुलाबा वेधशाळेपासून त्यांच्या सेवेला प्रारंभ केला. त्या 1995 पासून पुणे हवामान विभागात कार्यरत आहेत.

हेही वाचा

Back to top button