चाळीस वर्षे झाली, तरी बाहेरची कशी? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

चाळीस वर्षे झाली, तरी बाहेरची कशी? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आता सासूचे चार दिवस संपले आहेत. सुनेचे चार दिवस येऊ द्यात, कायम सासू… सासू करत राहिलात तर सुनेने काय नुसतं बघतच बसायचं का, बाहेरची… बाहेरची… असं कुठं असतं का रावं. आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. आता 40 वर्षे झाली तरी बाहेरची कशी? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला. सुपे येथे आयोजित महायुतीच्या संवाद मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासह कुटुंबीयांवर पुन्हा निशाणा साधला. पवार म्हणाले, खासदारांनी काहीच काम केले नाही, त्यामुळे केंद्राचा निधीच मतदारसंघात आला नाही.

जो काही निधी आला तो राज्य शासनाचा. काही जण आता खासदारांची पर्स कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. अहो, पण मी खासदारांची पर्स सांभाळणारा नाही. त्या स्वतःची पर्स स्वतःच सांभाळणार. मी फक्त कामे करून घेणार. विद्यमान खासदारांपेक्षा उद्याच्या खासदाराची कारकीर्द निश्चितच उजवी असेल. आता जे प्रचारासाठी फिरत आहेत, ते 7 मे नंतर तुम्हाला दिसणार पण नाहीत. मतदानानंतर त्यांनी परदेश दौरा काढला नाही तर नावाचा अजित पवार नाही. हे या लोकांचे कामच नाही असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news