कोल्हापूर : संवर्धनानंतर अंबाबाई मूर्ती दर्शनासाठी खुली | पुढारी

कोल्हापूर : संवर्धनानंतर अंबाबाई मूर्ती दर्शनासाठी खुली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली आहे. मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे मंगळवारी सकाळी धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. दोन दिवसांनंतर भाविकांनी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेतले. देवीचा वार असल्याने दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे मंदिरातील गाभारागृह दोन दिवस बंद होते. देवीची उत्सवमूर्ती पितळी उंबर्‍याबाहेर दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. यामुळे दोन दिवस भाविकांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. मंगळवारी गाभारागृह खुले झाल्यावर दुपारपर्यंत विधिवत धार्मिक पूजा झाल्यावर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. देवीची अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीनुसार मूर्तीची संवर्धन प्रक्रिया राबविण्यात आली. यात पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद येथील रसायनतज्ज्ञ विभागाचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांचा समावेश होता.

Back to top button