Loksabha election 2024 : आणे पठारवासीयांचा मतदानावर बहिष्कार | पुढारी

Loksabha election 2024 : आणे पठारवासीयांचा मतदानावर बहिष्कार

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : आणे पठार (ता. जुन्नर) येथील श्रीरंगदास स्वामी महाराज मंदिरात गुरुवारी (दि. 11) पठार विकास संस्थेंतर्गत पाणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत येणार्‍या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर  यापूर्वी  ग्रामसभांनी घेतलेल्या बहिष्कार ठरावाला हात उंचावत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, पेमदराच्या सरपंच जयश्री गाडेकर,  नळवणेच्या सरपंच अर्चना उबाळे, पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते, पाणी समितीचे सदस्य गोरखनाथ शिंदे, भारतीय किसान संघाचे जुन्नर  तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते, देवस्थानचे माजी अध्यक्ष पोपट दाते,  शिंदेवाडीचे माजी सरपंच रोहिदास शिंदे, एम. डी. पाटील- शिंदे, पाणी समितीचे संचालक किरण आहेर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे, माजी सरपंच योगेश आहेर, आनंदा  बेलकर, संतोष दाते, गुलाब दाते, प्रकाश दाते, बाळशिराम आंद्रे, विष्णू  दाते, कान्हू हांडे, शंकर आहेर, जालिंदर आहेर, अरुण आहेर  आदी या वेळी उपस्थित होते.

वर्षभरापूर्वी ग्रामसभांनी मतदानावर टाकलेल्या  बहिष्कार ठरावानुसार पाणी समितीची यापुढील दिशा ठरविणे, सर्वप्रथम  गावोगावी बहिष्काराचे बॅनर्स-फ्लेक्स लावणे, पत्रके वाटणे, प्रचार  दौर्‍याप्रमाणे जनजागृती करण्यासाठी ध्वनीक्षेपक फिरविणे,  वेळप्रसंगी प्रशासनास जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन करण्याबाबतची मते बैठकीत नोंदविण्यात आली.
सूत्रसंचालन बाबाजी आहेर यांनी केले, तर देवस्थानचे माजी अध्यक्ष विनायक आहेर यांनी आभार मानले.

श्रीरंगदास स्वामी महाराज मंदिरात पाणी समितीची बैठक
शासकीय यंत्रणेकडून ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत पठारावरील  चारही गावच्या ग्रामसभांनी पारित केलेला बहिष्कार ठराव मागे घेतला जाणार  नाही.

– मधुकर दाते,  कार्याध्यक्ष, पठार विकास संस्था

यापुढील काळात सर्व ग्रामस्थांनी राजकीय जोडे व मतभेद बाजूला ठेवून पाणी  कमिटीच्या मागणीनुसार बहिष्काराच्या ठरावास एकमुखी पाठिंबा द्यावा.

– किरण आहेर,  संचालक, पाणी समिती

हेही वाचा

Back to top button