Bacchu Kadu : ‘विलीनिकरणाची मागणी हा कामगारांचा अडमुठेपणा’ | पुढारी

Bacchu Kadu : ‘विलीनिकरणाची मागणी हा कामगारांचा अडमुठेपणा’

पुणे : भाग्यश्री जाधव

विलीनिकरणाचा कामगारांचा मुद्दा हा अडमुठेपणा आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर अडून राहण्यापेक्षा पगार वाढ मिळत असेल तर काय हरकत आहे. एसटी कामगारांनी जास्त ताणू नये. सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे धोरण धरू नये, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले.

राज्यमंत्री कडू (Bacchu Kadu) म्हणाले, जिल्हाधिका-यांचा चालक एक माणसासाठी ४० हजार पगार घेतो. आणि शेकडो लोकांना घेऊन जाणारा एसटी ड्राइव्हर १२ हजार पगार घेतो. ही तफावत दिसता काम नये. सरकार आणि कामगार यांच्यात समन्वय झाला पाहिजे. विलीनीकरणाला आमचा विरोध आहे. पगार वाढून कसा मिळेल हा प्रश्नमार्गी लागला पाहिजे, असं त्यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती एवढी गंभीर नाही. गंभीरता गेलेली आहे. मात्र, टांगती तालावर आहे. दुसरा व्हायरस येऊन अडचणी उभा करू शकतो. पण मला वाटते आता शाळा चालू करायला काहीच अडचणी नाही. विद्यार्थ्यांच्या मनावर पण दुष्परिणम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा विचार करायला काहीच हरकत नाही. सध्या शाळा सुरू करू वाटेल तेव्हा बंद करता येईल, असेही ते म्हणाले.

Back to top button