Weather Report : पुणेकरांना सकाळ बरी, दुपारी उन्हाचे चटके.. | पुढारी

Weather Report : पुणेकरांना सकाळ बरी, दुपारी उन्हाचे चटके..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रविवारची सकाळ आल्हाददायक वातावरणात उगवली. गार वारे अन् ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल, असे वाटत असतानाच दुपारी 12 नंतर शहरात उष्णतेचा वणवा पुन्हा पेटला होता. शहराचे तापमान 40 अंशांवर गेले होते, त्यामुळे दुपारी अंगाची लाही लाही झाली. रविवारी सकाळी पाऊस पडेल, असे वातावरण सकाळी 7 पासून तयार झाले होते. आकाशात सूर्यदर्शन सकाळी झाले नाही. गार वारे सुटले, त्यामुळे पाऊस पडेल, असे वाटत असतानाच 8.30 च्या सुमारास सूर्यकिरणे दिसू लागली. मात्र उन्हाचा दाह कमी जाणवत होता. दुपारी 12 नंतर मात्र ढग गायब झाले आणि प्रखर उन्हाचा चटका सुरू झाला.

कमाल-किमान तापमान

शिवाजीनगर 40(19.8), पाषाण 39(20.1), लोहगाव 40 (22.2), चिंचवड 40 ( 24), लवळे 41(25.1), मगरपट्टा 41 (25.1), एनडीए 40 (18.7), कोरेगाव पार्क 41( 24.4) (आजचा अंदाजः आकाश अंशतः ढगाळ राहील.)

हेही वाचा

Back to top button