दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे | पुढारी

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे

  • महापालिका ‘अलर्ट मोड’वर

  • परदेशांतून आलेल्यांवर विशेष लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण आफ्रिकेतून काही दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लक्षणे दिसून आली असून त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. ‘ओमायक्रॉन व्हेरीएंट’चा धोका लक्षात घेऊन महापालिकेचा आरोग्य विभाग ‘अलर्ट मोड’वर आला आहे. दरम्यान, परदेशातून पुण्यात येणार्‍या नागरिकांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

‘इंधनांवरील उपाययोजनांमध्ये ऊस पीकच ठरेल गेमचेंजर’

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असताना कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा नवीन ‘अवतार’ समोर आल्यामुळे चिंता वाढली आहे. महापालिका प्रशासनाने याविरोधात तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना महापालिका प्रशासनाला मिळालेल्या आहेत.

early morning swearing : ‘पहाटेच्या शपथविधी’वर आजही पश्चात्ताप : देवेंद्र फडणवीस

तसेच केंद्र सरकारनेही राज्य सरकारला सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग ’अलर्ट मोड’वर आला आहे. गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या विशेषत: दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ऑस्ट्रिया, झिंबाब्वे, जर्मनी, इस्राईलमधून कोण नागरिक आले आहेत का, याची माहिती गोळा केली जात आहे.

Dilip Walse Patil : परमबीर आणि वाझेंच्या बंद दाराआड भेटीची चौकशी सुरु, कारवाई होणार

दक्षिण आफ्रिकेतून काही दिवसांपूर्वी एक नागरिक पुण्यात आला आहे. त्याचा शोध लागला असून त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. चाचणीसाठी त्याचे नमुने घेतले असून ती व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली तर तो ’ओमिक्रॉन’बाधित आहे का, याची चाचणी केली जाणार आहे. त्या व्यक्तीला सध्या ’होम क्वारंटाईन’ केले असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी आता पुण्यात नियमांची सक्ती

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या भारतातील इतर शहरातून पुण्यात आलेल्यांची माहिती गोळा केली जाणार आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी हा संसर्गातील चढ-उतार असावा, असा अंदाज आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे तयार असल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले.

जगातल्या या पाच दिग्गज कंपन्यांचे सीईओ आहेत भारतीय

Back to top button