दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; सहा लाखांवर विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

Development Skills
Development Skills

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) राज्यातील दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्ती देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दुष्काळी भागातील बारावीच्या 2 लाख 84 हजार 208 विद्यार्थ्यांना, तर दहावीच्या 3 लाख 28 हजार 914 अशा एकूण 6 लाख 13 हजार 122 विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे. तसा शासननिर्णयच शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

यंदा राज्यात कमी पाऊस पडल्याने राज्यभरातील 40 तालुक्यांसह 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याबात राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना, तसेच त्यासंदर्भातील कार्यवाहीबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्तीसाठी 32 कोटी 7 लाख 97 हजार 475 रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून सादर करण्यात आला होता. यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 कोटी 88 लाख 24 हजार 925 रुपये, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 16 कोटी 19 लाख 62 हजार 550 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news