अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समूह विद्यापीठे अर्थात क्लस्टर विद्यापीठ विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने क्लस्टर विद्यापीठासंदर्भातील नियमावली मंजूर करून राज्यातील संस्थाचालकांना आपल्या विविध महाविद्यालयांचे मिळून क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, समूह विद्यापीठे निवडताना अत्यंत काटेकोरपणे निवडली जाणार आहेत. ज्या महाविद्यालयांनी किंवा शैक्षणिक संस्थांनी समूह विद्यापीठासाठी प्रस्ताव सादर केला, त्यांच्यामध्ये खरेच ती क्षमता आहे का? याची चाचपणी केली जाणार आहे. स्वायत्त महाविद्यालये होऊन त्यांच्याकडे दहा वर्षांचा अनुभव आहे का? ते स्वत: परीक्षा घेऊ शकतात का? याचा आढावा घेतला जाणार आहे.