

सारथीची स्थापना होऊन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु, मराठा समाजाच्या हितासाठी व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेल्या या संस्थेचा फायदा तळागाळातील गरजवंत मराठा समाजाला अजूनही झालेला नाही. सारथीच्या योजना अजूनपर्यंत समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचलेल्या नाहीत, याला कारणीभूत सारथीचे संचालक मंडळ आहे. बार्टीच्या धरतीवर सर्व योजना लागू करताना समतादूतसारखा महत्त्वाचा प्रकल्प जो बार्टीच्या यशाचा कणा आहे, अशा प्रकारचा तारादूत प्रकल्प सारथीने पहिल्यापासून नाकारला आणि यामुळेच आज मराठा समाजातील तळागाळामधील विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल कोणतीही माहिती नाही.– सचिन आडेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, पुणे शहरसारथीचा तारादूत प्रकल्प हा शासनाकडूनच बंद केला आहे. हा प्रकल्प बंद केला असला तरी सारथीच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहचविण्याचे काम तहसीलदारांमार्फत होत आहे. यासाठी उपजिल्हाधिकार्यांची जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंतीनिमित्त गावपातळीवर होणार्या ग्रामसभेच्या माध्यमातूनही सारथीच्या योजना पोहचविण्याचे काम सारथीच्या वतीने सुरू आहे.– अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी