weather update : मराठवाड्यासह कोकणात कमी तर विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस | पुढारी

weather update : मराठवाड्यासह कोकणात कमी तर विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

आशिष देशमुख

पुणे : मार्च महिन्यात सरासरी 30 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, देशातील 13 राज्यांत सरासरीपेक्षा 80 ते 95 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यात महाराराष्ट्रातील कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांचा समावेश आहे. फक्त विदर्भात सरासरीपेक्षा 23 टक्के जास्त पाऊस पडला आहे. देशात मार्च महिन्यातही पाऊस पडतो. त्याची सरासरी 30.9 मि.मी. आहे. पूर्वोत्तर राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने देशाची मार्चची सरासरी 29.9 टक्के इतकी भरली आहे. मात्र 36 पैकी 13 राज्यात 90 ते 95 टक्के पाऊस कमी झाला. 10 राज्यांत अतिवृष्टी, 5 राज्यांत साधारण, 5 राज्यांत मध्यम, 4 राज्यांत कमी पाऊस झाला आहे.

देशात अल निनो स्थिती सक्रिय आहे. त्यातही मध्य भारताचा काही
भाग, पश्चिम राजस्थान, दक्षिण भारत पूर्ण आणि महाराष्ट्रातील मध्य, उत्तर मराठवाडा या भागावर जास्त प्रभाव जाणवला. त्यामुळे मार्च महिन्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवली. याउलट विदर्भात उष्णता असूनही पावसाने तापमान किंचित कमी राहिले.

-डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

  • अतिवृष्टी : उ.प्र. (पूर्व, उत्तर) बिहार, झारखंड, म.प्र. (पूर्व व उत्तर) ओडिशा, प. बंगाल, गुजरात (कच्छ, सौराष्ट्र)
  • मुसळधार : म. प्र., पश्चिम, महाराष्ट्र (विदर्भ) हिमाचल प्र, उत्तराखंड, सिक्कीम
  • साधारण : जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, चंदीगड, पूर्व राजस्थान, आसाम, मेघालय
  • कमी पाऊस : नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, येमेन
  • खूप कमी : महाराष्ट्र (मध्य व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण), प. राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, रॉयलसीमा, पुद्दुचेरी, केरळ.

हेही वाचा

Back to top button