पुणेकरांना उन्हाच्या झळा असह्य; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला | पुढारी

पुणेकरांना उन्हाच्या झळा असह्य; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा-पंधरा वर्षांतील सर्वोच्च किमान तापमानाची नोंद 1 एप्रिल रोजी झाली. लवळे भागातील किमान तापमानाचा पारा 27.9 अंशांवर गेला होता. दिवसाचे कमाल तापमानही 39 अंशांवर गेल्याने यंदाचा उन्हाळा पुणेकरांना असह्य होत आहे.
शहरात गेले पंधरा दिवस सतत उष्णतेची लाट सक्रिय आहे. सोमवारी 1 एप्रिल रोजी शहराच्या किमान तापमानात किंचित वाढ झाल्याने रात्रीचे तापमान आणखी वाढले. लवळे भागात हंगामातील सर्वोच्च 27.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

किमान तापमानाचा असाही विक्रम

पुणे शहराचे किमान तापमान राज्यातील पहिल्या पाच शहरांत आहे. सोलापूर, अकोला, परभणी यानंतर पुणे शहरातील वडगाव शेरी भागाचे किमान तापमान सोमवारी 27.9 अंशांवर गेले. तर शिवाजीनगरचे किमान तापमान राज्यात सर्वांत कमी 20.1अंशांवर खाली आले.
11 ते 4 काम नसेल, तर फिरू नका हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, शहरात यंदा दरवर्षीच्या तुलनेत खूप जास्त उष्मा वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे हे होत आहे. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत महत्त्वाचे काम नसेल, तर नागरिकांनी बाहेर पडू नये.

तज्ज्ञांनी सांगितले उपाय

  • सतत पाणी जवळ ठेवा
  • सरबत, ताक, पन्हे सेवन करा
  • उन्हात जाताना सनकोट, गॉल, टोपी, रुमाल यांचा वापर करा

हेही वाचा

Back to top button