धक्कादायक ! भांडगावला कंपनीत वायू गळती; एक मृत्युमुखी, दोन जखमी | पुढारी

धक्कादायक ! भांडगावला कंपनीत वायू गळती; एक मृत्युमुखी, दोन जखमी

यवत : पुढारी वृत्तसेवा :  भांडगाव(ता. दौंड) येथील वेस्टर्न मेटल कंपनीत वायू गळती होऊन एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. भांडगाव मधील खोर रोड लगत असणाऱ्या या कंपनीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही वायू गळती झाली असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनी मधील गोडावूनमध्ये वायू गळती होऊन ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे.

यात खोर (ता .दौंड) मधील अमोल सुरेश चौधरी (वय 24 )याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर भगवान पुजारा (रा. यवत) आणि पंकज जाधव (रा. भरतगाव )यांच्या वर लोणी काळभोर मधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी यवत चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button