काळजी घ्या ! राज्यात तीन दिवस पावसाचे: उष्णतेची लाट मात्र कायम | पुढारी

काळजी घ्या ! राज्यात तीन दिवस पावसाचे: उष्णतेची लाट मात्र कायम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात 29 ते 31 मार्चदरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, पावसातही राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. देशाच्या विविध भागांत तीव्र तापमानामुळे अचानक हवामानात मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तान ते राजस्थान या भागात पश्चिमी चक्रवात तीव्र झाला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, अरुणाचल, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशपर्यंत 29 ते 31 मार्च या कालावधीत पावसाचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

असा आहे पावसाचा अंदाज

  • कोकण : 29 व 30 मार्च
  • मध्य महाराष्ट्र : 29 व 30 मार्च
  • मराठवाडा : 29 व 30 मार्च
  • विदर्भ : 29 ते 31 मार्च

हेही वाचा

Back to top button