Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकरांच्या खुनाबाबत महत्वाची माहिती समोर..

Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकरांच्या खुनाबाबत महत्वाची माहिती समोर..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाची वेळ नक्की कोणती? याबाबत गूढ आहे. त्याबाबतचा कोणताच वैद्यकीय पुरावा रेकॉर्डवर नाही, असा दावा बचाव पक्षाने बुधवारी (दि.27) न्यायालयात केला.
डॉ. दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. बुधवारी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी अंतिम युक्तिवाद केला. बचाव पक्षाने सीबीआय तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संजय साडविलकर याने तपास अधिकारी सिंग यांना 1988 ते 1993 दरम्यान पिस्तूल विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय करायचो असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात न्यायालयात त्याने सांगितले की, मी सीबीआयला असे काहीच सांगितले नाही. साडविलकर आणि सिंग यांच्या बोलण्यात तफावत आहे. सीबीआयला आपण खोटे आरोपी घेतले हे माहिती आहे म्हणूनच त्यांनी योग्यप्रकारे तपास केला नाही, असा दावा बचाव पक्षाने केला. तसेच, संजीव पुनाळेकर यांच्या लॅपटॉपमधील पत्र सीबीआयने जप्त केले. पुढील सुनावणी दि. 8 एप्रिलला होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news