पिंपरी : शहरातून खासगी वाहने सुसाट | पुढारी

पिंपरी : शहरातून खासगी वाहने सुसाट

पिंपरी : पंकज खोले :

एसटी संपामुळे चालकांची चांदी

नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईमध्ये निघालेल्या तरुणाला एसटी संपाचा मोठा फटका बसला.
सवलतीची वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने दुप्पटीने पैसे मोजून खासगी वाहनांतून धोकादायक प्रवास करावा लागला.

एवढेच नव्हे तर, पुण्यात परतण्यासाठी मुंबईतील वाहन चालकांनी पैशाची अडवणूक केल्याने नाइलाजास्तव तिप्पट भाडे भरावे लागले. हा अनुभव आला निगडी येथील तरुण अरुण शिंदे यांना. एसटीचा सलग एकविसाव्या दिवशी सुरू असलेल्या संपामुळे खासगी वाहनचालक मनमानी दर आकारात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणारा आरटीओ विभाग नियमांवर बोट ठेवून तक्रारीची वाट बघत असल्याचे दिसून आले.

MH Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर अखेरला

प्रवाशांकडून तिकीटाच्या माध्यमातून लूट

एसटीचा संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होते आहेत. नोकरी, व्यवसाय यानिमित्त राज्यातंर्गत जाणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे.ऐरवी सवलतीच्या दरात आणि सुरक्षित वाटणार्‍या एसटीची सेवा विस्कळीत झाल्याने अन्य खासगी वाहनांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.

शहरातून कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अहमदनगर यासह कोकणात फेर्‍या जातात.या वाहनांना गर्दी असल्याने एसटी प्रशासनास जादा फेर्‍याचे नियोजन करावे लागते. दरम्यान, आता एसटीच्या संपामुळे या मार्गावर जाणारा मोठा ग्राहक हा खासगी वाहनांवर अवलंबून राहिला असून, या वाहनांना मोठा प्रवासी वर्ग मिळाला आहे.

लॉकडाऊनची भरून काढली कसर

गेल्या दीड वर्षांपासून टाळेबंदीत खासगी वाहने प्रामुख्याने बस, मोटारी उभ्या होत्या. अनेक वाहनांनी त्याची देखभाल दुरुस्तीही केली नाही. मात्र, आता एसटीच्या संपामुळे ही वाहने बाहेर येवू लागली आहेत. कोणतीही पर्वा न करता वाहनचालक ही वाहने प्रवाशांना घेवून जात आहेत. त्यामुळे टाळेबंदीत बंद असलेल्या वाहनांची कसर भरून काढत असल्याचे दिसून येत आहे.

sangeeta bijlani : वयाच्या ६१ व्या वर्षीही सलमानची एक्स गर्लफ्रेंड ग्‍लॅमरस

खासगी वाहतूकदारांना मोकळे रान

शहरात एसटी सेवा बंद असल्याने आरटीओकडून खासगी वाहनांतून प्रवासी नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या आरटीओची परवानगी असल्याचे समजून व संपाच्या काळात कारवाई होत नसल्याने खासगी बस व कॅब चालकांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे ते प्रवासी वाहनाचालकांची लूट करीत आहेत.

Hemangi Kavi’s styling : चर्चा हेमांगी कवीच्या आजीच्या ऐवजची….

या ठिकाणी होत मोठे वाहतूक

एसटी संप व आगार लांब असल्याने अनेक ठिकाणी मोक्याच्या जागी हे खासगी वाहनचालक पोचतात. शहरातील काळेवाडी फाटा, डांगे चौक, भोसरी रस्ता, भूमकर चौक, चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, अहिंसा चौक या ठिकाणी या वाहनचालकांना मोठा व जादा पैसे देणारा प्रवासी वर्ग मिळू लागला आहे.

शासनाच्या सूचनेनुसार प्रवासी व मालवाहतूक खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या परिसरातून जाणार्‍या वाहनांना तोच दर आकारानेे अनिर्वाय आहे.
-अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

 

 

 

 

Back to top button