ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर !

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर !
Published on
Updated on

पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार आज जाहीर झाला आहे.पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे आज ही घोषणा केली . डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं यंदाचे पुरस्कार्थी निश्चित केले आहे. यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली .

पुरस्कराचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. सलग ३५ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही ह्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. आहे बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतांसह वैशिष्ट्यपूर्ण अशा या पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे. पुरस्काराच्या रक्कमेत या वर्षी पासून वाढ करण्यात आली असून रू १,००,०००( रुपये एक लाख) वरून ती रु. २,००,००० (रुपये दोन लक्ष) करण्यात आली आहे. पुरस्कार रकमेचा धनादेश  पुरस्कार्थी डॉ. विजय भटकर यांना देण्यात येईल . पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात येईल.

महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशिलकुमार शिंदे, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायणमूर्थी, शरद यादव, नितीन गडकरी, पं.हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान व पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news