Sangli News : चिंचणी मंगरूळ येथे महिला सरपंचाला भर मासिक सभेत सदस्यांकडून मारहाण | पुढारी

Sangli News : चिंचणी मंगरूळ येथे महिला सरपंचाला भर मासिक सभेत सदस्यांकडून मारहाण

विटा : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत महिला सरपंचाला महिला सदस्यांकडून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रकार चिंचणी मंगरूळ (ता. खानापूर) मध्ये बुधवारी घडला. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात महिला सदस्यांविरुद्ध सरपंच महिलेने रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे. Sangli News

याबाबत माहिती अशी, चिंचणी मंगरूळ या गावी बुधवारी मासिक सभा होती. सरपंच रेवती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या मासिक सभेस ग्रामविस्तार अधिकारीही उपस्थित होते. गेले काही दिवस सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप काही सदस्यांकडून होत होता. यामुळे काही सदस्य मासिक सभेस अनुपस्थित राहत होते. बुधवारच्या बैठकीवेळी प्रभागातील पाणी का बंद आहे. या कारणावरून सरपंच श्रीमती भोसले आणि सदस्या शुभांगी सुर्वे यांच्यात वाद झाला. Sangli News

या वादात श्रीमती सुर्वे यांनी सरपंच महिलेचे ओढाओढीत बोट मोडले आणि त्यांना तुझी पात्रता नसताना तुला मी सरपंच केले. तेच माझं चुकले, असे म्हणत वैयक्तिक पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी केली. तसेच जातीवाचक बोलून अवमान केल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल करण्यात आली. यानुसार  सुर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा टाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button