Gold Market | सोन्याला उच्चांकी झळाळी; तोळ्याला 66 हजार 600 रुपये | पुढारी

Gold Market | सोन्याला उच्चांकी झळाळी; तोळ्याला 66 हजार 600 रुपये

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेसह जगभरातील केंद्रीय मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर कपातीचे मिळत असलेले संकेत, डी डॉलरायझेशनची प्रक्रिया गतिमान झाल्याने सोन्याचा साठा करण्याचे वाढलेले प्रमाण, त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (दि.21) शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 66 हजार 600 रुपयांवर पोहोचला. तर चांदीचे एका किलोचे भाव 74 हजार रुपयांवर स्थिरावले. एका दिवसात सोन्याच्या भावात तोळ्यामागे एक हजार रुपये, तर चांदी किलोमागे दोन हजार रुपयांनी वधारल्याने सोन्या-चांदीच्या दराचा हा विक्रम ठरला.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून 62 हजार रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याच्या दरात भाववाढ सुरू झाली. त्यानंतर याच महिन्यात 65 हजारांचा पल्ला ओलांडला. त्यानंतर भाववाढ कायम राहत 9 मार्च रोजी सोने 66 हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चार दिवस स्थिर राहिल्यानंतर सोन्याचे भाव कमी होत जाऊन 65 हजार 500 रुपयांवर आले. त्यानंतर मात्र गुरुवारी (दि.21) पुन्हा 1 हजार रुपयांची वाढ होऊन ते 66 हजार 500 रुपये प्रतितोळा झाले. तर, चांदीतही एका दिवसात दोन हजार रुपयांची वाढ झाल्याने किलोचे भाव 76 हजारांवर पोहोचल्याची माहिती पुष्पम ज्वेलर्सचे संचालक जीत मेहता यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button