Leopard News : अखेर उंब्रजला तिसरा बिबट्याही जेरबंद ! | पुढारी

Leopard News : अखेर उंब्रजला तिसरा बिबट्याही जेरबंद !

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : उंब्रज येथे (ता. जुन्नर) सोमवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास तिसरा बिबट्या वन खात्याच्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या ही मादी असून, तिला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षांच्या बालकावर दि. 11 रोजी बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वन खात्याने या ठिकाणी तब्बल दहा पिंजरे, दहा ट्रॅप कॅमेरे, तसेच वन कर्मचारी नियुक्त केले. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

आयुष शिंदे या बालकावर हल्ला करणारा बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही, तोपर्यंत उंब्रज येथे पिंजरे व वन खात्याचे पथक तैनात राहणार असल्याचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आयुषवर हल्ला केल्यावर तत्काळ वन विभागाने त्या ठिकाणी दहा पिंजरे लावले होते. पहिला बिबट्या दि. 15 रोजी पिंज-यात अडकला. दुसरा बिबट्या दि.16 रोजी पहाटे पिंजर्‍यात जेरबंद झाला. सोमवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास तिसरा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. दरम्यान, वन खात्याने पकडलेल्या कोणत्या बिबट्याने आयुषवर हल्ला केला होता हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आयुषवर आळेफाटा
(ता. जुन्नर) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button