काँग्रेस आ. संजय जगताप यांना मोठा धक्का; खंद्या समर्थकांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस आ. संजय जगताप यांना मोठा धक्का; खंद्या समर्थकांचा भाजपात प्रवेश
Published on
Updated on

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर- हवेलीचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या तीन खंद्या समर्थकांनी रविवारी भाजपात प्रवेश केल्याने त्यांना मोठा राजकीय धक्का लोकसभा निवडणुका समोर असतानाच बसला आहे. सासवड येथे रविवारी (दि. 17) रात्री काँग्रेसचे नेते व माजी उपनगराध्यक्ष प्रदीप लांडगे, सुरेश गिरमे, बाळासाहेब भिंताडे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. एकेकाळी आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक असलेले हे तीन शिलेदार अचानक भाजपमध्ये गेले कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पश्चिम विभाग अध्यक्ष जालिंदर कामठे, भाजप नेते बाबाराजे जाधवराव, गिरीश जगताप, साकेत जगताप, नीलेश जगताप, भानूकाका जगताप, संतोष जगताप, सलिल जगताप, अमोल जगताप, गुलाब झेंडे, अविनाश झेंडे, अजित गोळे आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news