आयुक्त भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेत; आयुक्तांच्या निवासाबाहेर धंगेकरांचा ठिय्या | पुढारी

आयुक्त भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेत; आयुक्तांच्या निवासाबाहेर धंगेकरांचा ठिय्या

पुणे : महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचार सुरू असून आयुक्त हे भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका करत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकाच्या मार्फत कारभार हाकण्यात येतो. आयुक्तांकडून अ, ब, क आणि ड या प्रभागपद्धतीनुसार निधीचे वाटप करण्यात आले आहे. केवळ सत्ताधार्‍यांच्या प्रभागातील कामांना प्राधान्य दिले जात आहे. आयुक्त विक्रम कुमार भाजप कार्यकर्त्यासारखी भूमिका बजावत असून महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारास जबाबदार धरून आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

हेही वाचा

Back to top button