पुण्यात स्वप्नातल्या घरासाठी मोजावे लागतील जास्त पैसै; हे आहे कारण | पुढारी

पुण्यात स्वप्नातल्या घरासाठी मोजावे लागतील जास्त पैसै; हे आहे कारण

दिगंबर दराडे

पुणे : पुणे शहरात तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी आता जास्त पैसै मोजावे लागणार आहेत. पुणे शहरातील घरे महागणार आहेत. येत्या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर वाढवण्याकरिता  नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वाढीव दराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. तो मान्य झाल्यास गेल्या काही वर्षातील ही सर्वाधिक वाढ असणार आहे.

किती वाढणार दर :

नवीन आर्थिक वर्षापासून पुणे शहरातील घरे महाग होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क विभागाने सन 2024-25 साठी वाढीव दराचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये पुणे शहरात 20 ते 25 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 20 ते 22 टक्के तर ग्रामीण भागात 10 ते 15 टक्के दर वाढ प्रस्ताव आहे. रेडीरेकनर दर 1 एप्रिल 2023 बदलले जात असतात. रेडीरेकनरच्या वाढीव प्रस्तावाला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. परंतु, हा प्रस्ताव मान्य झाल्यास पुण्यातील घरांच्या किमती वाढणार आहेत. यामुळे पुणे शहर आणि परिसरातील घरांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत.
पुण्यात 2018-19 आणि 2019-20 मध्ये रेडीरेकनरचे दर हे स्थिर होते. त्यात काहीच बदल केला गेला नव्हता. त्यानंतर 2020-21 मध्ये 1.25 टक्के तर 2021-22 या वर्षात 5 टक्के दरवाढ केली. तो कोरोनाचा काळ होता. पुन्हा 2022-23 या आर्थिक वर्षात 9.2 टक्के दरवाढ झाली. आता तब्बल 20 ते 25  टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. ही दरवाढ लागू झाली तर आजपर्यंतची ही सर्वात मोठी दरवाढ राहणार आहे.

रेडीरेकनर दरवाढीत महत्त्वाचे घटक

  • मालमत्तेचे स्थान
  • मालमत्तेचा प्रकार (व्यावसायिक, निवासी, कृषी, भूखंड)
  • परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा
  • मालमत्तेचे रजिस्ट्रार मूल्य
  • मालमत्ता किती जुनी आहे

हेही वाचा

Back to top button