कोल्हापूर : डेंग्यूसद़ृश आजाराने युवकाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : डेंग्यूसद़ृश आजाराने युवकाचा मृत्यू

शिरढोण; पुढारी वृत्तसेवा : शिरढोण (ता. शिरोळ) येथील तरुणाचा डेंग्यूसद़ृश तापाने बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. राकेश प्रकाश वाघमोडे (वय 20) असे त्याचे नाव आहे.

राकेश याला इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांपूर्वी त्याला डेंग्यूसद़ृश आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अहवाल मिळाला होता. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शिरढोण येथे व परिसरात कचर्‍याचे ढीग साचून राहिले आहेत. त्यामुळे आजारांची साथ गावात पसरत आहे. दरम्यान, नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी गुरुवारी या परिसरातील प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे केला. तसेच कचरा, पाणी साचू देऊ नका तसेच कोरडा दिवस पाळा अशा सूचना नागरिकांना दिल्या. डेंग्यूसद़ृश आजाराने तरुणाचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीसह आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

Back to top button