खुशखबर ! विद्यापीठ साडेतीनशे विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती.. | पुढारी

खुशखबर ! विद्यापीठ साडेतीनशे विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2023- 2024 पासून छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती लागू केली आहे. त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखीय व मानव्यविज्ञान विद्याशाखा, अशा विद्याशाखानिहाय प्रत्येकी 87 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक, अव्यावसायिक नियमित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच एप्रिल-मे 2023 मध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लागू केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त विद्यापीठाने 350 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच, यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी इतकी तरतूद केली आहे.

– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या निधीतून विविध शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी विद्यापीठातर्फे अधिक प्रयत्न केला जात आहे.

– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठ नेहमीच विद्यार्थिहिताचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संशोधनासाठी चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त या वर्षापासून 350 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

– डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

Back to top button