पुणे: कोळवाडी येथे गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला | पुढारी

पुणे: कोळवाडी येथे गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा: कल्याण-नगर महामार्गांवर ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोळवाडी (ता. जुन्नर) येथे अवैधपणे गोमांस वाहतूक करणारा टेम्पो व चालक यांना ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही माहिती ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने वेगात जाणारा टेम्पो (एमएच १२ क्यूडब्लू २८७१) यास बजरंग दलाचे कार्यकर्ते व ओतूर पोलीस यांनी थांबवून तपासणी केली. यावेळी सुमारे १५०० किलो गोमांस भाजीखाली दडवून विक्रीसाठी मुंबईकडे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. अवैधपणे गोमांस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी ही बाब ओतूर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत ऋषिकेश मल्हारी शेलार (रा. ओतूर) यांनी फिर्याद दिली आहे.

टेम्पो चालक नासिर मोहंमद शेख (रा. संगमनेर, कोल्हेवाडी, जि. अहमदनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलीस हवालदार भारती भवारी करत आहेत. ही कामगिरी ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनात हवालदार नामदेव बांबळे, महेश पटारे, बालशिराम भवारी, संदीप भोते यांनी केली. बजरंग दलाचे कार्यकर्ते रविराज चाळक, सुशांत डुंबरे, निखिल घोगरे, प्रताप लोहटे आदींनी त्यांना सहकार्य केले.

हेही वाचा 

Back to top button