पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटाजवळ 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा.. | पुढारी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटाजवळ 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

पुणे : पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट लोणावळ्यापर्यंत सकाळी 4 वाजायच्या(दि.8 मार्च) सुमारास वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावर रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या लेनची शिस्त पाळल्या जात नव्हती. या वाहतूक कोंडीत ॲम्बुलन्ससारखी वाहने आणि काही मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा अडकून पडल्या होत्या. यामुळे या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली. वाहतूक कोंडीत मंत्र्यांची गाडी विरुद्ध दिशेने वळवण्यात येऊन त्यांना जुन्या पुणे-मुंबई मार्गाने नेण्यात आले.

या मार्गावर रात्रीच्या वेळी अवजड वाहने सोडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले होते. त्यातच अनेक ट्रक आणि चार चाकी गाड्या येथे बंद पडल्या त्याहीमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडली. बोरघाट क्षाला संपर्क करायला टोल फ्री क्रमांक असला तरी त्यावर रिस्पॉन्स मिळत नव्हता. महामार्ग पोलिसांचे वाहतूक कोंडी होण्याच्या कारणांकडे दुर्लक्ष होत चालले आहे त्याचा परिणाम असा रात्री अपरात्री या द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होण्यात होतो. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा

Back to top button