Elvish Yadav : एल्विश यादवची यूट्यूबरला मारहाण, गुन्हा दाखल, सागर ठाकूरने केले गंभीर आरोप (Video)

एल्विश यादव
एल्विश यादव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवने सागर ठाकूर या मॅक्सटर्न यु-ट्युबरला मारहाण केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एल्विश सागरला मारताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडिओवरून एल्विशवर कारवाई करण्यात आली आहे. गुरूग्रामच्या सेक्टर ५३ पोलीस ठाण्यात एल्विश यादव विरुद्ध आयपीसी कलम १४७, १४९, ३२३, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

सागर ठाकूरने केले गंभीर आरोप

सागर ठाकूर उर्फ ​​मॅक्सटर्न हा दिल्लीतील मुकंदपूर भागातील रहिवासी आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत म्टले आहे, एल्विश यादवने केवळ हल्ला केला नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. अशा परिस्थितीत पोलिसांनी लवकरात लवकर एल्विशवर कारवाई करावी.

कोण आहे मॅक्सटर्न?

मॅक्सटर्न हा एक युट्यूबर आहे, जो गेमिंगशी संबंधित व्हिडिओ बनवतो. सागर ठाकूरने सांगितले की, तो एल्विश यादवला २०२१ पासून ओळखतो.

सागर ठाकूरच्या म्हणण्यानुसार, त्याला एल्विश यादवच्या वतीने भेटण्यास सांगितले होते. याबाबत एल्विश आपल्याशी बोलेल असे त्याला वाटले, मात्र एल्विश यादव दुकानात पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत असलेले ८ ते १० गुंड होते. सर्वांनी त्याला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

सागरने एल्विश यादववर गंभीर आरोप केले आहेत. त्याने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की एल्विश यादवने त्याच्या पाठीचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व जण ८ मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता आले. दुकानातून बाहेर पडण्यापूर्वी एल्विश यादवने सागर ठाकूरला जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी एल्विशची वैद्यकीय चाचणी करावी, अशीही सागरची मागणी आहे.

काय आहे प्रकरण?

एल्विश यादवला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यूट्यूबरला सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये खेळताना पाहण्यात आलं होतं. येथे मुनव्वर फारूकीदेखील उपस्थित होता. एल्विश आणि मुनव्वर फारूकीचा क्रिकेट मॅच दरम्यान गळाभेट घेतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुनव्वर फारूकी सोबत एल्विश यादवचे फोटो काही फॅन्सना आवडली नव्हती. सागर ठाकुरने देखील एल्विश यादवसोबतचा मुनव्वर फारूकीचा फोटो ट्विट केला होता. यानंतर त्याच्या पोस्टवर एल्विश यादवने उत्तर दिलं. 'भाई तू दिल्लीत राहतोस, तुला आठवण करून देतो.'

यानंतर सागर आणि एल्विश यादव यांच्या मध्ये सोशल मीडियावर शाब्दिक बाचाबाची झाली. व्हॉट्सॲपवर देखील वाद झाला. मग दोघांनी भेटण्याचे ठरवले. दोघांची भेट गुरुग्रामच्या मॉलमध्ये झाली. तेथे एल्विशने काही लोकांना सोबत घेऊन सागरला मारहाण केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news