भाजप म्हणजे ‘भ्रष्टाचार जुमला पार्टी’ मॉडेल : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

भाजप म्हणजे ‘भ्रष्टाचार जुमला पार्टी’ मॉडेल : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निशिकांत दुबे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आरोप केले होते की, आदर्श घोटाळ्यात काही गोष्टी आहेत. आदर्श घोटाळा हा अशोक चव्हाण यांनी केला, हे मी नाही बोलत, पण हे भाजपकडून सांगितले जात होते. तरीही त्यांना आता भाजपमध्ये घेण्यात आले. त्यामुळे भाजप हे ‘भ्रष्टाचार जुमला पार्टी’ हे मॉडेल तयार झाले असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
एसएसपीएमएस येथील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याही भाजप प्रवेशाबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्या नावाप्रमाणेच रोहित पवार तसेच माझी, अशा बर्‍याच लोकांची रोज चर्चा असते. भाजपकडे 200 आमदार असले तरी त्यांना आमच्याकडचेच लोक त्यांना पाहिजे असतात. त्याचा अर्थ हाच असतो की, आमच्यामध्ये काही तरी टॅलेंट आहे, असा टोलाही त्यांनी या वेळी लावला.

असे कसे चालेल?

आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आमच्यासाठी एक आणि अद़ृश्य शक्तीसोबत असलेल्यांसाठी दुसरा न्याय, असे कसे चालेल? संविधानचा अपमान करून अद़ृश्यशक्ती देश चालवत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर खासदार सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा

Back to top button