वृद्धापकाळ जाणार आरामदायी..! | पुढारी

वृद्धापकाळ जाणार आरामदायी..!

वृद्धापकाळातील लोकांच्या शुश्रूषेसाठी नीती आयोगाने योजना तयार केली आहे. त्यानुसार कर सुधारणा, सक्तीची बचत, गृह योजना आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. सन 2050 मध्ये देशातील वृद्धांचे प्रमाण 19.5 टक्क्यांवर जाणार आहे. ज्येष्ठ आणि वृद्ध लोकांच्या सेवेसाठी पोर्टल विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे सीनिअर केअर रिफॉर्म्स इन इंडिया या अहवालात नीती आयोगाने म्हटले आहे.

10 टक्के

सध्या भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 10 टक्के, अर्थात 104 दशलक्ष आहे. सन 2050 पर्यंत भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 19.5 टक्क्यांवर पोहोचणार आहे.

60 टक्के

ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांच्या संख्येचा प्रश्न जगभरच भेडसावत आहे. जगात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण 60 टक्के आहे.

आयुर्मान 70

अर्भक मृत्यूचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. लोकांचे आयुर्मानही 70 वयाहून अधिक वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे.

ज्येष्ठांवरील आर्थिक भुर्दंड कमी होणार

बचतीवरील व्याज बदलत असल्याने ज्येष्ठांचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बचतीवर योग्य व्याज दर मिळण्यासाठी कायदेशीर यंत्रणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

उदरनिर्वाहाचा प्रश्न

देशातील सामाजिक सुरक्षेचा आराखडा मर्यादित आहे. त्यामुळे व्यापक स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ज्येेष्ठ नागरिकांना त्यांच्या बचतीवर वृद्धापकाळातील जीवन जगावे लागते.

75 टक्के ज्येष्ठांना दुर्मीळ आजार

भारतातील 75 टक्के ज्येष्ठ नागरिकांना दुर्मीळ आजारांचा मुकाबला करावा लागत आहे .

Back to top button