बारामती : पुढारी वृत्तसेवा, राष्ट्रवादीतील फूटीनंतर पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यानंतर बारामतीतून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. आजच (दि.१६) यासंबंधीची घोषणा अजित पवार यांच्याकडून होवू शकते. सुनेत्रा पवार यांची माहिती देणारे चित्ररथ शुक्रवारी बारामतीत फिरू लागले. त्यामुळे नणंद-भावजय संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले. (Pawar Vs Sule)