‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त शहरात प्रेमाचा बहर : प्रेमीयुगुलांमध्ये उत्साह | पुढारी

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त शहरात प्रेमाचा बहर : प्रेमीयुगुलांमध्ये उत्साह

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रेम व्यक्त करण्याचा… प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा… प्रेम साजरे करण्याचा हक्काचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे! प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी प्रेमीयुगुलांची जय्यत तयारी झाली असून, दुकाने, मॉल, कॉफी शॉप, हॉटेल्स अशा ठिकाणी प्रेमाचा बहर दिसत आहे. ‘हॅपनिंग’ ठिकाणी हटके पद्धतीने डेकोरेशन करण्यात आले आहे.

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं सेम असतं…’ असे पाडगावकरांनी म्हटले असले, तरी स्वप्नांचे झुलणारे झोपाळे, प्रेमात बेभान होणे, अंगावर फुलणारे रोमांच, प्रेमातील रुसवा-फुगवा याबद्दलही त्यांनी नेमकेपणाने भाष्य केले आहे. प्रेमाचे हेच धडे भेटवस्तुरूपाने व्यक्त करण्यासाठी प्रेमीयुगुले सज्ज झाली आहेत. बाजारात चॉकलेट्स, टी-शर्ट, दागिने, गिफ्ट बॉक्स, फुले या वस्तूंची रेलचेल आहे.
‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीप्रमाणे इथे प्रत्येक गोष्ट हटके पद्धतीने साजरी केली जाते; म्हणूनच ‘शब्दसारथी’तर्फे प्रेमावरील कवितांचा सोहळा साजरा केला जाणार आहे, ‘सरद’ जोडप्यांना हटके प्रेमपत्र लिहून देण्यासाठी सरसावले आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज, लॉ कॉलेज रस्ता, कॅम्प, कल्याणीनगर, बावधन, एनआयबीएम सज्ज झाले आहेत.

सोशल मीडियावरही ‘व्हॅलेंटाईन डे’ हिट

सोशल मीडियावर कायमच विशेष दिवसांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. व्हॅलेंटाईन डेही सध्या फेसबूक, इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे. मलाँग डिस्टन्स रिलेशनशिपफ अर्थात वेगवेगळ्या शहरात, राज्यात किंवा देशात राहणाऱ्या जोडप्यांनी एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करणाऱ्या रील्स, व्हिडीओ, मेसेज या माध्यमांची निवड केल्याचेही दिसत आहे.

हेही वाचा

Back to top button