‘किसान सन्मान निधी’त समावेशासाठी विशेष मोहीम ; कृषी आयुक्त प्रवीण गेडाम

‘किसान सन्मान निधी’त समावेशासाठी विशेष मोहीम ; कृषी आयुक्त प्रवीण गेडाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणार्‍या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यानुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत. या मोहिमेंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकाला जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकर्‍यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे.

शेतकर्‍यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकर्‍यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1 लाख 4 हजार शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकर्‍यांची नव्याने नोंदणी करण्यात आली.

ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. शेतकर्‍यांनी अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news