प्रवेशाचे माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागणार; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश | पुढारी

प्रवेशाचे माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागणार; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांनी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी किमान 60 दिवस अगोदर त्यांच्याद्वारे राबविण्यात येणार्‍या शैक्षणिक अभ्यासक्रमांचे माहितीपत्रक सर्व प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधित संस्थांना दिले आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिलेल्या मुलभूत तत्वांमध्ये शैक्षणिक प्रणालीची अखंडता, पारदर्शकता आणि संसाधन कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी लेखापरीक्षण आणि सार्वजनिक प्रकटीकरणाची नियमावली असावी असे तत्व समाविष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दि. 11 एप्रिल, 2023 च्या अधिसूचनेन्वये विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण) विनियम, 2023 प्रसिद्ध केले आहेत.

हेही वाचा

Back to top button