विमानतळाची धावपट्टी वाढविण्याला गती; अजित पवारांची अधिकार्‍यांशी चर्चा

विमानतळाची धावपट्टी वाढविण्याला गती; अजित पवारांची अधिकार्‍यांशी चर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरील धावपट्टी सध्या अपुरी आहे, ती वाढविण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी (दि.9) पुण्यातील अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यामुळे आता धावपट्टी वाढवण्याच्या प्रस्तावाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे महानगर पालिका आयुक्त यांच्याशी पुणे विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली.

याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. लोहगावमधील नवीन विमानतळ टर्मिनल बांधले तरीसुद्धा विमानांची उड्डाणे नियोजितपणे होण्यासाठी धावपट्टी वाढवण्याची सध्या गरज आहे. त्यापार्श्वभूमीवर पवार यांनी पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या पाहणीनंतर पुण्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार विमानतळावरील धावपट्टी एक किलोमीटरने वाढवावी लागणार आहे. त्यासाठी 135 एकर जागा खरेदी करावी लागणार आहे. त्याकरिता आवश्यक निधी राज्य सरकार, दोन्ही महापालिका, पीएमआरडीए यांच्याकडून घेण्यासंदर्भात चर्चा झाली. यामुळे लवकरच पुणे विमानतळाची धावपट्टी वाढणार असल्याची चिन्हे असून, पुणेकर विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news