धायरीत नऊ इमारतींवर महापालिकेचा हातोडा; अनधिकृत बांधकामावर कारवाई | पुढारी

धायरीत नऊ इमारतींवर महापालिकेचा हातोडा; अनधिकृत बांधकामावर कारवाई

धायरी : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड परिसरातील धायरी येथील नऊ टोलेजंग अनधिकृत इमारतींवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या वेळी 40 हजार चौरस फुटांवरील बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले होते. त्यांनी सुरुवातीला या कारवाईस विरोध केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, अधिकार्‍यांनी विरोध न जुमानता ही कारवाई सुरू केली. जॉ कटर, दोन जेसीबी, डंपर, वीस बिगारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या पुढेदेखील परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कारवाईमुळे या भागात अवैध बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा

Back to top button