पुणेकरांनो लक्ष द्या ! गुरुवारी या भागात पाणीपुरवठा असेल बंद | पुढारी

पुणेकरांनो लक्ष द्या ! गुरुवारी या भागात पाणीपुरवठा असेल बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्वती येथील पाण्याच्या टाक्यांची विद्युत व पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. 8) शहराच्या दक्षिण भागातील पर्वती, बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती, कात्रज, धनकवडी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

पर्वती जलकेंद्र अंतर्गत : पर्वती एचएलआर (गोल व चौकोनी) टाकी परिसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-1 व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42,46 (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वतीदर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर आदी.

हेही वाचा

Back to top button