Accident News : टेम्पोच्या धडकेने दोन ठार

Accident News : टेम्पोच्या धडकेने दोन ठार
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पुणे- पानशेत रस्त्यावर वेगाने जाणार्‍या टेम्पोची धडक बसल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. खडकवासला धरण परिसरात भारतीय लष्कराच्या डीआयडी संस्थेजवळ रविवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
पांडुरंग शंकर रणधीर (वय 71, रा. खडकवासला) व विनायक दिलीप भगत (वय 40, सध्या रा. कोंढवे धावडे, मूळ रा. भगतवाडी, बहुली, ता. हवेली), असे मृतांची नावे आहेत. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले.

हवेली पोलिस अंमलदार संतोष तोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणारा टेम्पो पानशेतच्या दिशेने जात होता. त्या वेळी डीआयडी संस्थेजवळील वळणावर पायी चाललेल्या रणधीर यांना टेम्पोची जोरात धडक बसली. त्या वेळी चालकाने अचानक टेम्पो थांबविल्याने पाठीमागून येणार्‍या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली. त्यात दुचाकीचालक भगत हे गंभीर जखमी झाले. या दोघांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेतला असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news