‘बार्टी’तर्फे राज्यातील युवक-युवतींना मिळणार मोफत कौशल्य प्रशिक्षणाचे धडे | पुढारी

‘बार्टी’तर्फे राज्यातील युवक-युवतींना मिळणार मोफत कौशल्य प्रशिक्षणाचे धडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘बार्टी’च्या कौशल्यविकास विभागांतर्गत राज्यातील अनुसूचित जातींमधील 500 युवक-युवतींसाठी टाटा स्ट्रेव्हमार्फत पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई येथे मोफत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट (टाटा स्ट्रेव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्यविकास विभागामार्फत सन 2023-24 या वर्षात विविध अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने मागील वर्षी मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला होता. या सामंजस्य करारांतर्गत पुणे (नर्‍हे), नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई, तळोजा या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बार्टीच्या कौशल्यविकास विभागांतर्गत अनुसूचित जातीमधील 500 युवक-युवतींसाठी ही मोफत प्रशिक्षणाची संधी आहे.

या प्रशिक्षणासाठी उपलब्ध कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत. ते असे, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, अ‍ॅटो सेल्स कन्सलटंट, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस असोसिएट, रिटेल सेल्स असोसिएट, अ‍ॅसिस्टंट इलेक्ट्रिशियन, अ‍ॅसिस्टंट थेरपिस्ट, जनरल ड्युटी असिस्टंट, क्युक सर्व्हिस रेस्टॉरंट, एक्झिक्युटिव्ह, अ‍ॅटोमेटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन (दुचाकी) : अ‍ॅटोमेटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन (फोरव्हीलर), फुड अ‍ॅण्ड बेव्हिरीज- स्टेवुर्ड, फिल्ड टेक्निशियन (ए.सी.), अ‍ॅटोमेटिव्ह टेली कॉलर नावनोंदणीची शेवटची तारीख 6 फेब—ुवारी 2024 अशी आहे.

प्रशिक्षणाचे इतर फायदे

इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, कंप्युटर व उद्योजकीय प्रशिक्षण, मोफत प्रशिक्षण साहित्य (पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वही, पेन, इ.), 100% नोकरीसाठी साहाय्य.

हेही वाचा

Back to top button