व्हॅमनिकॉम’ परिषद : स्टार्टअपमुळे नवउद्योजकांना संधी : माजी मंत्री सुरेश प्रभू

व्हॅमनिकॉम’ परिषद : स्टार्टअपमुळे नवउद्योजकांना संधी : माजी मंत्री सुरेश प्रभू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण अर्थव्यवस्था समाजाचा कणा असला, तरी पारंपरिक व्यवसाय व उद्योगांसमोर आज अनेक आव्हाने आहेत. त्याचा सामना करीत आणि नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन लोकांच्या गरजेनुसार सुरू केलेले नवनवे उद्योग निश्चित यशस्वी होतील. त्यातून देशात स्टार्टअपमधून नवे उद्योगपती तयार होतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी येथे व्यक्त केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत 'सहकार से समृद्धी' या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. 2) स्टार्टअप परिषदेत ते बोलत होते. या वेळी सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक डॉ. ज्योती मेटे, वैकुंठ मेहता संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव, दूरदर्शनचे केंद्रप्रमुख अजित बागल तसेच सेंटर फॉर आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंटचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत कदम, केअर फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अवधूत कदम, विनोद पातरकर यांची प्रमुख उपस्थिती होते. राज्यातील 35 स्टार्टअप आणि 20 सहकारी संस्थांचे जवळपास 350 सदस्य सहभागी झाले होते. या वेळी एकूण 61 संस्थांचा प्रभू यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ. हेमा यादव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. अवधूत कदम यांनी आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news