Pimpri News : नागपूरचे अधिकारी चालवणार आयुक्तालयाचा कारभार ? | पुढारी

Pimpri News : नागपूरचे अधिकारी चालवणार आयुक्तालयाचा कारभार ?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर पोलिस आयुक्तालयातील तब्बल 19 पोलिस निरीक्षक पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदलून आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत नागपूरचे पोलिस अधिकारी दाखल झाल्याने आता पिंपरी-चिंचवडचा कारभार नागपूरचे पोलिस अधिकारीच चालवणार असल्याचे बोलले जात आहे.

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नियमानुसार पोलिस अधिकार्‍यांचा बदल्या करण्याचे आदेश दिले. यामध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 27 पोलिस अधिकारी बाहेर गेले आहेत. तर, 24 जण बाहेरून शहरात आले आहेत. यातील 19 जण नागपूर येथे कार्यरत होते. दरम्यान, शहरातील प्रभारी अधिकार्‍यांची अकार्यकारी पदावर म्हणजेच गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या जागेवर नागपूरहून बदलून आलेल्या निरीक्षकांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नागपूर पॅटर्न चालण्याची शक्यता आहे.

राजकीय गणिते असल्याची चर्चा

महाराष्ट्र पोलिस दलात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर ही महत्त्वाची आयुक्तालये म्हणून गणली जातात. पुणे आणि नागपूरमध्ये नोकरी केलेल्या सनदी अधिकार्‍यांना तसेच राज्य सेवेतील अधिकार्‍यांना मुंबई आणि ठाणे येथे जायचे असते; मात्र राज्यातील पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकगठ्ठा अधिकारी एका आयुक्तालयातून दुसर्‍या आयुक्तालयात बदलीवर पाठविण्यात आल्याने या बदल्यांच्या मागे राजकीय गणिते जोडली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नाराज अधिकारी मॅटमध्ये जाणार ?

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील 130 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ठराविक अधिकार्‍यांना सामावून घेण्यासाठी आमच्यावर अन्याय केला, अशी नाराजी काही पोलिस अधिकारी व्यक्त करत आहेत. अनेक अधिकारी या बदल्यांच्या आदेशाविरोधात मॅटमध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) जाण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महासंचालक कार्यालयाकडून राज्यभरातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 27 पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तर, 24 पोलिस निरीक्षक बदली होऊन पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आले आहेत.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क

पिंपरी-चिंचवड शहरातून गेलेले अधिकारी

अजित लकडे (सोलापूर शहर), शिवाजी गवारे (ठाणे शहर), सुनील गोडसे (नागपूर शहर), शंकर डामसे (ठाणे शहर), शैलेश गायकवाड (नागपूर शहर), दिलीप शिंदे (सोलापूर शहर), शंकर बाबर (ठाणे शहर), ज्ञानेश्वर साबळे (ठाणे शहर), रणजीत सावंत (नागपूर शहर), दीपाली धाडगे (नागपूर शहर), प्रसाद गोकुळे (नागपूर शहर), सुनील पिंजन (नागपूर शहर), रामचंद्र घाडगे (नागपूर शहर), विश्वजीत खुळे (नागपूर शहर), मच्छिंद्र पंडित (नागपूर शहर), बाळकृष्ण सावंत (नागपूर शहर),प्रकाश जाधव (नागपूर शहर), दीपक साळुंखे (ठाणे शहर), शहाजी पवार (सोलापूर शहर), किशोर पाटील (नागपूर शहर), सुनील तांबे (ठाणे शहर), रूपाली बोबडे (नागपूर शहर), अरविंद पवार (नागपूर शहर), युनूस मुलाणी (नागपूर शहर), अनिल देवडे (छत्रपती संभाजीनगर शहर), दशरथ वाघमोडे (गडचिरोली), सोन्याबापू देशमुख (नागपूर शहर)

पिंपरी-चिंचवड शहरात आलेले अधिकारी

वैजयंती मांडवधरे (नागपूर शहर), विश्वनाथ चव्हाण (नागपूर शहर), विनोद चौधरी (नागपूर शहर), बापू ढेरे (नागपूर शहर), दीपक गोसावी (नागपूर शहर), प्रवीण कांबळे (नागपूर शहर), प्रदीप राईनवर (नागपूर शहर), अमित डोळस (नागपूर शहर), संग्राम शेवाळे (नागपूर शहर), अमोल देशमुख (नागपूर शहर), राजेंद्रकुमार सानप (नागपूर शहर), गणेश जामदार (नागपूर शहर), नितीन फटांगरे (नागपूर शहर), बबन येडगे (नागपूर शहर), भारत शिंदे (नागपूर शहर), ऋषिकेश घाडगे (नागपूर शहर), भीमा नारके (नागपूर शहर), भारत कराडे (नागपूर शहर), गोरख कुंभार (नागपूर शहर), अमोल फडतरे (डीआयजी गडचिरोली), संदीप पाटील (गडचिरोली), विजयकुमार वाकसे (अमरावती शहर), मालोजी शिंदे (ठाणे शहर), धनंजय कापरे (ठाणे शहर)

हेही वाचा

Back to top button