Weather Update : ढगाळ वातावरणामुळे राज्यात थंडीची तीव्रता कमी

Weather Update
Weather Update

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात 26 जानेवारीपर्यंत थंडीची लाट तीव्र राहणार आहे. त्या भागातून राज्यात शीतलहरी येत असल्याने राज्यातील जळगाव, नाशिक, पुणे शहराचा पारा 10 ते 12 अंशांवर खाली आला आहे. मात्र बहुतांश भागात ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता किंचित कमी झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे थंडीचा कहर जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रविवारचे राज्याचे तापमान

जळगाव 10.2, नाशिक 12, पुणे 12.8, छत्रपती संभाजीनगर 12.6, कोल्हापूर 17.5, मुंबई 19.8, रत्नागिरी 19.3, महाबळेश्वर 14, सांगली 17.6, सातारा 14, सोलापूर 18.4, धाराशिव 18.6, परभणी 16.7, नांदेड 19.6, अकोला 15.5, अमरावती 15.5, बुलडाणा 12.8, चंद्रपूर 15.0, गोंदिया 14.5, नागपूर 16.5, यवतमाळ 15.5.

मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

हवेच्या वरच्या थरात कमी दाब तयार झाल्याने वार्‍याचा वेग वाढल्याने मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात 22 व 23 रोजी तर विदर्भात 22 ते 24 जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news