Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला | पुढारी

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला

पुणे : कर्नाटक ते विदर्भ अन् मराठवाडा भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी घट होण्यास सुरुवात झाली आहे. गेले दहा दिवस राज्यात थंडीचा कडाका जाणवत होता; मात्र बंगालच्या सागरात वार्‍यांची गती वाढली आहे. तसेच मराठवाडा अन् विदर्भात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे.

त्यामुळे शनिवारपासूनच किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. आगामी तीन ते चार दिवस असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारचे राज्याचे तापमान

जळगाव 11, पुणे 13.4, नगर 14.4, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर 14, नाशिक 12.7, सांगली 18.1, सातारा 14.6, सोलापूर 18.6, छत्रपती संभाजीनगर 14.4, परभणी 17, नांदेड 18.6, अकोला 17.4, अमरावती 15.6, बुलडाणा 15, चंद्रपूर 15.4, चंद्रपूर 15.4, गोंदिया 14, नागपूर 17.2.

हेही वाचा

Back to top button