MPSC : औषध निरीक्षकपदासाठीची अट सरकारकडून रद्द

MPSC : औषध निरीक्षकपदासाठीची अट सरकारकडून रद्द
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यसेवा परीक्षेतून भरल्या जाणार्‍या औषध निरीक्षक पदासाठीची चार वर्षे अनुभवाची अट राज्य सरकारने रद्द केल्यामुळे बी.फार्म झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अन्न व औषध  प्रशासनाकडून अपुर्‍या औषध निरीक्षकांमुळे तपासात येणार्‍या अडचणी दूर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  17 नोव्हेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अनुभवाची अट व सेवा प्रवेश नियमातील त्रुटी असल्याच्या कारणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहत राहिले होते. त्यासाठी उमेदवारांनी आंदोलन केल्यामुळे औषध निरीक्षकपदाची जाहिरात स्थगित करण्यात आली होती. परंतु आता राज्य सरकारकडून औषध निरीक्षक पदासाठी असलेले सुधारित सेवा प्रवेश नियम अधिनियम प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाचक अशी अनुभवाची अट औषध निरीक्षकपदासाठी अनेक वर्षांपासून होती. जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षे उलटून गेली तरी सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होत नव्हते. त्यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करून आता सेवा प्रवेश नियम अंतिम झालेले आहेत. त्यामुळे फार्मसीच्या पदवीधरकारांना आता ही परीक्षा देता येईल.
– आदित्य वगरे, विद्यार्थी, औषधनिर्माणशास्त्र.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news